लोहा| विधानसभेच्या निवडणूकीत जातीवाद झाका..पण हे अतिशय धोकादायक आहे राजकारणात ज्यांनी जातीवर केले ते पुढे यशस्वी झाले नाहीत पण कधी नव्हे इतका त्रास कार्यकर्त्याना सुद्धा झाला.पण मला सर्व माहिती आहे कोण काय केले आहे ते दूध का दूध…पाणी का पाणी होईल आता विरोधात काम करणाऱ्यांना पुन्हा घेणे नाही तुम्ही।संयम ठेवा सर्व जाती धर्माच्या मतदारांनी तसेच बाहेरील मित्रपरिवारानी माझ्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले हा एकजुटीचा सर्व जाती धर्मच्या लोकांचा विजय असून जातीवाद करणाऱ्यानी या मतदारसंघाने नाकारले ही आपला सदैव ऋणी आहे अशी कृतज्ञता नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.
नवनिर्वाचित आमदार प्रतापराव विजयी झाल्या नंतर पहिल्यांदा लोह्यात आले. त्याचे उत्स्फूर्त उत्साहात .. अभूतपूर्व स्वागत लोहा शहर वासीयांनी केले. व्यंकटेश गार्डन येथे मतदारांचे जाहीर आभार सोहळा आयोजित करण्यात आला होता.व्यासपीठावर जिल्ह्याध्यक्ष दिलीप धर्माधिकारी ,माजी नगराध्यक्षा कल्याणराव सूर्यवंशीसंध्याताई राठोड , माणिकराव मुकदम किरण वट्टमवार, प्राणिताताई देवरे चिखलीकर, प्रवीण पाटील, आनंदराव पाटील, हंसराज पाटील बोरगावकर, मनोहर पाटील , केशवराव मुकदम ,छत्रपती धुतमल , नाना तिडके, करीम शेख, सचिन पाटील चिखलीकर, शोभाताई बगडे, जफारोद्दीन बहोद्दीन, हरिभाऊ चव्हाण, दता वाले, नरेंद्र गायकवाड, दीपक पाटील, अविनाश सूर्यवंशी, भगवान हाके , सचिन मुकदम, हरिभाऊ चव्हाण यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी कार्यकर्त्यांचे मतदारांचे आभार मानताना त्याचा कंठ दाटून आला होता.जातीवाद मोठ्या प्रमाणात झाला सर्व उमेदवारानी माझ्या वाट्टेल ते बोलले ज्याची लायकी नव्हती तेही बोलले पण मी संयम ठेवला शांत होतो.आता येणाऱ्या काळात माझट निवडणूकीत ज्यांनी मला मदत केली माझ्या साठी ज्यांनी प्रामाणिकपणे काम केले त्याना मी दूर करणार नाही.केंद्रात राज्यात आपली सत्ता आहे.
प्रामाणिक कार्यकर्ता माझ्यासाठी गावात प्रयत्नशील राहिला.जातीवाद प्रचंड झाला पण एका जातीवाद निवडणूक होत नाही आणि ज्यांनी जातीवर मते मागितली त्यांना इतर जातीच्या लोकांनी नेहमीच धडा शिकवला आहे.ज्यांनी ज्यांनी सोबत राहून दगा दिला त्याची माझ्याकडे नोंद आहे.माझ्या सारख्या कार्यकर्त्याना तुम्ही नेहमीच साथ दिली आडचणीच्या काळात एकजुटीने राहिलात आणि हा विजय सर्व जातीधर्मचा लोकांचा आहे मतदारांचा आहे मतदारसंघात एखादाउद्योग आणण्याचा माझ्या प्रयत्न राहणार आहे. आपले सर्वांचे आभार मानतो असा शब्द प्रतापरावांनी कृतज्ञता व्यक्त केली संचालन व आभार बी डी जाधव, भास्कर पाटील यांनी केले
प्रचंड उत्साह….. अभूतपूर्व स्वागत
कंधार मार्गे लोह्यात आगमन झाल्या नंतर नवनिर्वाचित आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर याच्यावर सहा जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली .छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर ,पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवाद केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक यास त्यांनी पुष्पहार अर्पण केला. शहरात अभूतपूर्व . उत्साहात स्वागत करण्यात आले कोण आला रे..कोण आला..मन्याड चा वाघ आला. असा घोषणानी परिसर दुमदुमला.
प्रतापराव पाटील चिखलीकर गहिरवले
जातिवादात ही निवडणूक झाली पण जनतेनी माझ्यावर प्रेम केले आणि एकजुटीने विजय मिळवून दिला हे मी कधी विसरणार नाही असे मतदारांचे आभार व्यक्त करताना प्रतापरावांचा कंठ दाटून आला. ते गहिरवले.विरोधात काम करणाऱ्याना माफी नाही असा शब्दात त्यांनी संकेत दिले.