नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेतील गर्दीचा फायदा घेवुन, एका इसमाने पाठीमागुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडली. ती चैन त्याचे इन्होवा कारमधील साथीदारांना देवुन, कारमध्ये बसून पलायन करण्याचा बेतात असलेल्या इसमास पोलिसांनी पकडले आहे.
दिनांक 09/11/2024 रोजी नांदेड लोकसभा पोटनिवडणुक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे प्रचाराचे अनुषंगाने नांदेड शहरात नरेंद्र मोदी, पंतप्रधान, भारत सरकार यांची मोदी मैदान, मामा चौक, नांदेड येथे सभा अयोजित करण्यात आली होती. त्या दरम्यान सभा संपल्यानंतर सांयकाळी 17.30 वा. यातील फिर्यादी हा त्यांचे साथीदारांसह परत जात असतांना गर्दीचा फायदा घेवुन, एका इसमाने पाठीमागुन त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन बळजबरीने हिसका मारुन तोडली व ती चैन त्याचे इन्होवा कारमधील साथीदारांना देवुन, कारमध्ये बसतांना फिर्यादीने आरडा ओरड केल्याने त्यांचे साथीदारांनी त्यास पकडले.
तेंव्हा ती इन्होवा कार तेथुन भरधाव वेगाने निघुन गेली. तेथे हजर असलेले पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, स्था.गु.शा. नांदेड यांना सदरची माहिती समजल्यानंतर त्यांनी सदर इसमाकडे त्याचे ईतर साथीदारांबाबत विचारपुस केली असता त्याने त्याचे ईतर तिन साथीदारांसह एका इन्होवा कारमध्ये हैद्राबाद राज्य तेलंगाना येथुन नांदेड येथे आल्याचे सांगीतले. सदरची संशईत इन्होवा कार ही नायगाव रोडने गेल्याची माहिती मिळाली.
त्यावरुन मा. अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सर्व पोलीस यंत्रणा अलर्ट करुन, पो. स्टे. नायगाव हद्दीत नाकाबंदी करुन, संशईत इन्होवा कार क्रं. AP 15 AY 1313 हिस आडविणे बाबत व सदर कारचा सुगावा घेवुन, स्थानिक गुन्हे शाखेला तिचा पाठलाग करणे बाबत आदेशित केले. सदर इन्होवा कारला पोलीस ठाणे नायगाव हद्दीत अडवुन, तिची पाहणी केला असता सदर कारमध्ये तिन इसम मिळुन आले. त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी चैन स्कैचींग, पिक पॉकेटींग करण्यासाठी हैद्राबाद येथुन आल्याची कबुली दिली व त्यांचा एक साथीदार यापुर्वी सभेच्या ठिकाणी लोकांनी पकडल्याचे सांगीतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन एक सोन्याची चैन व गुन्हयात वापरलेली इन्होवा कार जप्त करण्यात आली आहे. इसम नामे 1) पवन कन्हैया उपाद्ये, रा. हबीबनगर नाका, हैद्राबाद राज्य तेलंगाना 2) मंगल अभिमन्यु उपाद्ये, रा. मल्लापल्ली, अफजलसागर, हैद्राबाद राज्य तेलंगाना 3) बालाजी पुंडलिकराव बिरादार, रा. शिवाजीनगर, आतापुर ता. जि. रंगारेड्डी यांना ताब्यात घेतले आहे.
यातील फिर्यादी यांनी पोलीस ठाणे नांदेड ग्रामिण येथे दिलेल्या तक्रारीवरुन वर प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीतांना पुढील तपास कामी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण यांचे स्वाधीन केले आहे अशी नांदेड पोलीसांनी उत्कृष्ट कामगीरी केली आहे. त्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक साहेब यांनी त्यांचे कौतुक केले आहे.