मानवी जीवनामध्ये मैत्री एक असा दागिना आहे की, संपूर्ण जगतामध्ये या दागिन्याचे महत्त्व सर्वाधिक. आणि मग समान शिले समान व्यसनेसु सख्यम या न्यायाने आपले आहार आपले विचार आपले स्वातंत्र्य आपली अभिव्यक्ती आणि आपले छंद या सर्व प्रकारातून विविध मित्रांच्या गाठीभेटी आयुष्यभर होत असतात. जन्मापासून ते या जगाचा निरोप घेईपर्यंत अनेकविध पातळीवर आपण काम करत असतो, परंतु प्रत्येक ठिकाणी आपणाला भेटणारी माणसे त्यांच्याशी आपले होणारे अनुबंध आणि त्यातून निर्माण होणारा आनंद हा नेहमी सर्व आनंदांपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो!


अशाप्रकारे ओळख झालेला आणि अचानक जीवनामध्ये जिवलग मित्र बनून गेलेला आमचा हर हुन्नरी कलाकार कलंदर मित्र म्हणजे पत्रकार विजय जोशी! जे सामना पेपरचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून आहेत! विशेष म्हणजे विजय जोशी या नावाचं गारुड सगळ्या मित्रांनाच असतं! विजय जोशी हा माणूस अनेक विविध पातळीवर अनेक पैलू बाळगून असला तरी प्रत्येक क्षेत्रामध्ये या व्यक्तीचे उच्च पदस्थ लोकां पासून ते सामना वर्तमानपत्र विक्रेता जो सायकलवर पेपर वाटप फिरतो त्या व्यक्तीपर्यंतचे त्यांचे निर्माण झालेले अनुबंध आणि त्यातून निर्माण होणारे मैत्रीचे कैवल्य हा खूप मोठा ऐवज श्री विजय जोशी या व्यक्ती जवळ आहे. पहाडी आवाजाचा गीतकंठ लाभलेला हा मित्र अतिशय मनमिळाऊ आणि सुस्वाभावी असल्यामुळे संगीत आणि इतर कलाक्षेत्रातील विजय जोशी यांचा व्यासंग आणि मैत्रीचे अनुबंध आहेत. वेगवेगळ्या वर्तमानपत्रात काम करून सामना या वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी या पदावर स्थिरावलेले श्री विजय जोशी हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे!


महत्वाच्या क्षेत्रांमध्ये विविध पदांवर विराजमान असतांना जसे की, कोषाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद मुंबई, अध्यक्ष, राज्य शासन अधिस्वीकृती समिती, लातूर विभाग ई. पदांवर असतांना कुठलाही इगो न बाळगता भलमनसाहत हा गुण अंगी भिनून विजय जोशी पाय जमिनीवर ठेऊन सर्वांशी वागतात हे त्यांचे एक वेगळे स्वभाव वैशिष्टय आहे. आपल्या जाणिवा जागृत ठेऊन कष्टकरी श्योतकरी, सर्वसामान्य व्यक्तींसाठी तळमळ असणे हा त्यांचा अजून एक गुणविशेष . वास्तववादी लिखाण करतांना प्रसंगी व्यवस्थेवर प्रहार करीत असतांना कोणाचेही मन न दुखवता क्रिटीकल ॲनालिसीस करण्यावर त्यांच्या पत्रकारीतेचा भर असतो. सतत 27 वर्षे अव्याहत दैनिक सामना मध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून आपली पत्रकाराची भूमिका बजावतांना त्यांनी त्यांच्या प्रामाणिक कर्तव्यपरायणतेचा दाखला नेहमी दिला आहे.

समाजहित करतांना पत्रकारांना समाजभान व बातमी व्यवस्थापनापासून दूर राहून आपल्या लेखणीशी निष्ठा बाळगणारा पत्रकार म्हणून त्यांची ख्याती आहे. सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या पहाडी आवाजाने व भव्यमधूर गीतकंठाने गाणी गाणे हा छंद जोपासतांना त्यांनी महाविद्यालयीन जीवनात प्रादेशिक व राज्यस्तरावर अनेक पारितोषिक पटकावले आहेत. विशेष म्हणजे सैनिक हो तुमच्यासाठी, मराठी पाऊल पडते पुढे, गौरव महाराष्ट्राचा, मराठी पाऊल पडते पुढे, ये देश है वीर जवानोंका, गुढी पाडवापहाट, वाडीवरच्या वाटा, आदि कार्यक्रमातून मराठी रसिकांची सांस्कृतिक भूक भागवितांना देशभक्तीची जाज्वल्य जागृती करण्याचे काम श्री विजय जोशी यांनी केले आहे.

हया विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची निर्मिती, संकल्पना व सादरीकरण या तिन्ही भुमिकांत ते सतत वावरत असतात. गरजू व्यक्तींना मदत करण्याचा त्यांचा एक सच्चा प्रयत्न असतो व तो सतत यशस्वी होत असतो. सर्वांशी चांगले संबंध ठेऊन ते जपणे तसे एका पत्रकार व्यक्तीला खूप अवघड असते परंतु या बाबी त्यांनी खूप छानपणे सांभाळल्या आहेत.
मैत्री एक पूजा आहे, मैत्री एक शक्ती,
यशवंत अन किर्तीवंत एक जागृत भक्ती…
विजय जोशी सर यांना वाढदिवसानिमित्त अनुपम शुभेच्छा…