HomeनांदेडDegalur Police Station : देगलूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठक संपन्न

Degalur Police Station : देगलूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटी बैठक संपन्न

देगलूर, गंगाधर मठवाले| आगामी काळात होणाऱ्या विविध जयंती, सण आणि उत्सव कार्यक्रमांदरम्यान कसलेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी देगलूर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी भूषविले.

या बैठकीस देगलूर तालुक्यातील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. श्रावण महिन्यात पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा पोळा सण, तसेच आगामी गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. पोळा सणात शेतकरी बैलजोडीला हनुमान मंदिराभोवती पाच फेऱ्या मारून लग्न लावतात, अशी परंपरा आहे. अशा धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाकडून पोलीस पाटील यांना खबरदारीचे निर्देश देण्यात आले.

विशेष म्हणजे, बैठकीत अमली पदार्थांचे सेवन व अवैध व्यवहार रोखण्यासाठी पोलीस पाटील यांनी दक्ष राहावे, असे निर्देशही पोलीस निरीक्षक मुंडे यांनी दिले. तसेच चार पोलीस पाटील यांना तंबाखू-गुटखा सेवनापासून दूर राहण्यासाठी प्रवृत्त करून मनपरिवर्तन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments