नांदेड| येथील राज कार्नर जवळीत सहयोग नगरातील शिव पंचायतन मंदिर (महादेव मंदिर) येथे कळस पूर्नस्थापना सोहळा दि.१४.जुलै,रविवार रोजी भाविक भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाने सहयोग नगरातून कलश मिरवणूक काढून भजन किर्तनासह श्री. गणेश महाराज मठपती यांच्या शुभहस्ते कलशारोहण व पूजाविधी कार्यक्रम संपन्न झाला तसेच. महाप्रसादाचे वाटप करून कलशा रोहन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


याबाबत सविस्तर वृत्त असे की, सहयोग नगर, येथील शिव पंचायत मंदिर (महादेव मंदिर) असून मंदिराच्या वरिल भागामध्ये १९९५ ला कळस बसविण्यात आला होता. तो स्लॅब पावसामुळे २०२४ सालातील मे महीन्यात तुटुन खाली कोसळ्यामुळे महादेव मंदीराचा कळस ही पडला होता. त्यामुळे प्रभागातील नागरीकांनी एकत्र येत नवीन कळस बसविण्याचा निर्णय घेऊन भव्य सोहळ्याचे आयोजन करत विधीवत कलशारोहन केले.


यावेळी परीसरातील भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कळस पूर्नस्थापना सोहळ्यासाठी शिव पंचायत मंदिर सहयोग नगर चे मंदिर व्यवस्थापक विठ्ठलराव दिगंबरराव जगळपुरे ,संयोजक लक्ष्मीकांत वि. जगळपुरे समस्त सहयोग नगर मित्र मंडळाने परिश्रम घेतले.




