श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत व बाजार पेठ असलेल्या वाई बाजार येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील मुख्य टि.पॉईंट असलेल्या प्रवासी निवार्याजवळ ग्रामपंचायत मार्फत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या शौचालयाची साफ-सफाई करून योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे.वाई बाजार हे ५२ गाव खेड्याची मुख्य बाजारपेठ असून त्यासाठी बाहेरुण येणार्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशातच आता सणासुदीच्या काळात तथा नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदरील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याची मागणी व्यापारी वर्गासह गावकर्यांनी केली आहे.
येथील मुख्य टि.पॉईंट परीसरात असलेल्या प्रवासी निवार्याजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. मात्र हे शाैचालय घाणीच्या विळख्यात सापडले असून परिणामी दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.येथील व्यापारी,नागरिक व प्रवाशांना घाणीतून मार्ग काढत मूत्रीघरात लघुशंका करावी लागत आहे.स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून या शौचालयाचे अक्षरशा दुर्लक्ष झाले आहे.बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचा मागील अनेक महिण्यापासून मात्र एकही दिवस वापर झाला नाही. त्यामुळे हे शाैचालय निकामी ठरले आहे. या ठिकाणी पाण्याची साेय नाही.
सदर शौचालयात पाण्याचा व्यवस्थेसाठी वर टाकी आहे पण पाणी नाही.शिवाय या शौचालयाचे दरवाजेसुध्दा तुटफुट झाले असुन आतमध्ये शौचालयात पुर्णपणे घाण पसरलेली आहे. उघड्यावर शौचास बसणे किंवा लघुशंका करणे हा कायद्यानुसार गुन्हा ठरवला जातो. त्यामुळे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वत्र सार्वजनिक शौचालय उभारले जात आहे. मात्र येथील उभारण्यात आलेल्या शौचालयात स्वच्छता व व्यवस्थेअभावी या शौचालयांचा बट्याबोळ झाला असुन येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे.सदरील समस्या तत्काळ दूर करून सार्वजनिक शौचालय व्यवस्थित करुन देण्याची मागणी स्थानिक व्यापारी,प्रवाशी व जनतेनी केली आहे.
हागणदारीमुक्त उपक्रमास हरताळ !
शौचालयांची दुरवस्था असल्याने अनेक भागातील रहिवासी इच्छा नसताना रात्रीच्या अंधारात उघड्या मैदानात शौचालयास जात आहे. काही जण शौचालयांबाहेरच लघु शंका करतात. तर मुख्य बाजारपेठेत शौचालयांची व्यवस्था नसल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडूनही मोकळ्या जागांचा वापर होत आहे. यामुळे सरकारच्या हागणदारीमुक्त उपक्रमाचे तीन तेरा वाजत आहेत.