public toilets ; सार्वजनिक शौचालयाच्या दुरवस्थेने नागरिकांचे आरोग्य धोक्यात – NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत व बाजार पेठ असलेल्या वाई बाजार येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत येथील मुख्य टि.पॉईंट असलेल्या प्रवासी निवार्याजवळ ग्रामपंचायत मार्फत उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या शौचालयाची साफ-सफाई करून योग्य व्यवस्था करण्याची गरज आहे.वाई बाजार हे ५२ गाव खेड्याची मुख्य बाजारपेठ असून त्यासाठी बाहेरुण येणार्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. अशातच आता सणासुदीच्या काळात तथा नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदरील सार्वजनिक शौचालयाची साफसफाई करण्याची मागणी व्यापारी वर्गासह गावकर्यांनी केली आहे.
येथील मुख्य टि.पॉईंट परीसरात असलेल्या प्रवासी निवार्याजवळ सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. मात्र हे शाैचालय घाणीच्या विळख्यात सापडले असून परिणामी दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहे.येथील व्यापारी,नागरिक व प्रवाशांना घाणीतू...
