हिमायतनगर (अनिल मादसवार) शहरातील बाजारपेठेत सध्या सीताफळांचा हंगाम सुरू झाला असून, बाजारपेठेत सर्वत्र गोडसर सुगंध पसरला आहे. प्रत्येक अवस्थेतील सीताफळांची चव घेण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.


सीताफळाची मागणी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी बाजारपेठेतही मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी आणि विक्रेते यांना या हंगामात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीताफळाचे गोडसर स्वाद, पौष्टिकता आणि आरोग्यदायी गुणधर्म लक्षात घेता ग्राहक त्याला विशेष पसंती देत आहेत.



हिमायतनगर बाजारपेठेत दररोज शेकडो ग्राहक सीताफळ विकत घेण्यासाठी गर्दी करीत असून छोट्या विक्रेत्यांपासून ते घाऊक व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनाच या हंगामाचा फायदा होत आहे. सीताफळामुळे बाजारपेठेत पुन्हा एकदा चैतन्य निर्माण झाले आहे.




