नांदेड| जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मा.श्री अबिनाश कुमार साहेब पोलीस अधिक्षक नांदेड यांचे “ऑपरेशन फ्लश ऑऊट नुसार कार्यवाही चालु आहे. त्या नुसार पो.स्टे. इतवारा नांदेड येथील अवैद्य धंदयांची माहिती काढुन कार्यवाही करण्या बाबत मा. पोलीस अधिक्षक साहेब नांदेड यांनी आदेशीत केले होते.


दि.09/09/2024 रोजी मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. सुशीलकुमार नायक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली मा. उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालय इतवारा येथील पथकातील पोना अर्जुन मुंडे, पोकॉ स्वामी, पोकों दासरे, मपोना कोकणे व पोलीस स्टेशन इतवारा नांदेड येथील गुन्हे शोध पथकातील पोउपनि. श्री रमेश गायकवाड, पोना चाउस, पोकॉ कोरनुळे, पोकॉ जगताप, पोकों जावेद यांनी दिनांक 09/09/2024 रोजी अवैद्य धंदयांची माहिती काढुन केसेस करणेकामी पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली.


इस्लामपुरा इतवारा नांदेड येथे एका इसमानी त्याचे राहते घरात अवैद्य गुटखा ठेवल्या बाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी 16.05 वा. छापा भारला असता आरोपी नामे-मोहम्मद जुवेंर पि. अब्दुल खदीर वय 23 वर्ष रा.इस्लामपुरा नांदेड याने स्वतःचे फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशिर रित्या महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा, सुंगधीत जर्दा व व पान मसाला एकुण किंमत अंदाजे 58277/- रूपयाचा मिळुन आला त्यावरून पो.स्टे. इतवारा, नांदेड येथे गु.र.नं.342/2024 कलम 123, 274, 275 बी.एन.एस. सन 2023 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हयाचा तपास पोउपनि. विलास पवार हे करीत आहेत.

नय इतवारा येथील यात सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड, सुरज गुरव, अप्पर पोलीस अधिक्षक नांदेड, तसेच सुशीलकुमार नायक उप विभाग इतवारा, नांदेड, यांचे मर्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रणजीत भोईटे पो.स्टे. इतवारा व वरील गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंदन केले आहे याची
