नवीन नांदेड़ l शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांचा वाढदिवस सिडको येथे मोठ्या उत्साहात विविध क्रीडा संघटना पदाधिकारी व खेळाडू यांच्या उपस्थितीत करण्यात आला . वाढदिवसाच्या निमित्ताने 5 डिसेंबर रोजी जनार्दन गुपिले व भाजपा पक्षांच्या नावामनपाच्या माजी नगरसेविका सौ. बेबीताई गुपिले यांचा सपत्नीक सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी खो खो संघटनेचे डॉ.रमेश नांदेडकर ,फेन्सिंग असोसिएशनचे डॉ. राहुल वाघमारे ,मल्लखांब संघटनेचे कुलदीपसिंग जट ,कराटे संघटनेचे एकनाथ पाटील टेनिस हॉलीबॉल संघटनेचे कासिम खान ,राष्ट्रीय खेळाडू किरण नागरे ,कैलास पवार ,शिवाजी जाधव ,वैजनाथ नावंदे, संतोष कांबळे, रवी भाऊ सावळे, आकाश निमडगे, निलेश डोंगरे ,विशाल गडंबे, मुकुंद पाटील , यांच्या सह अनेक खेळाडू, मित्र परिवार उपस्थित होते.