श्रीक्षेत्र माहूर| माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षकाने दारु पिऊन चक्क शाळेतच धिंगाणा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार काल दि. 5 रोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणा-या या दारुड्या शिक्षकाला निलंबित करुन तययावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्याने गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सोमवारी वरिष्ठाकडे शिक्षकावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले


माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथील जि.प. शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शेकापूर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील गैरवर्तनाचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून सदरचा व्हिडीओ काल दि. ५ डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.. दरम्यान प्राप्त माहितीनुसार शेकापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अनंत वर्मा हे नेहेमीप्रमाणेच काल दि. ५ डिसेंबर रोजीही शाळेत दारूच्या नशेत आले होते.


त्यावेळी वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्याशी कथितरित्या अश्लील भाषेत बोलत होते. अधून मधून विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात विचित्र डान्स करत होते. ही सर्व बाब समाध्यमांवर फिरत असलेल्या व्हिडीओत स्पष्ट दिसत असून शिक्षकाच्या अशा अवस्थेने शाळेतील विद्यार्थी देखील प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत…



दरम्यान लाखो रुपयांचा पगार घेणारा दारूडा शिक्षक अनंत वर्मा हा विद्यार्थ्यांना शिक्षण न देता वर्गात दारू पिऊन येत असल्याच्या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येवून ठेपला असून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी कर्तव्यावर असताना शाळेत अश्लिल हातवारे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वास्थ्य बिघडविण्यासोबतच शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम करणाऱ्या शिक्षक अनंत वर्मा यांच्यावर शिक्षण विभागाने त्वरित निलंबनाची कार्यवाही करून तातडीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याची मागणी पालकवर्गाकडून करण्यात आली. तर सोशल मीडियावर सदरील व्हिडिओ नागरिकांनी व्हायरल केल्याने नोकरी अधिनियम 1967 मधील कलम 4 प्रमाणे कार्यवाही प्रस्तावित केली जाईल असे गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकर यांनी दूरध्वनीवर बोलताना सांगितले


