उस्माननगर, माणिक भिसे| नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या ठिकाणी हौशी तरुणांकडून सेल्फी घेण्याचे प्रकार घडत असून त्यामुळे जीव धोक्यात घालण्याचे प्रकार दिसून येतात.


याबाबत उस्माननगर पोलिस स्टेशनचे सपोनि संजय निलपत्रेवार यांनी नागरिकांना इशारा देत आवाहन केले आहे की, नदी-नाल्यावर सेल्फी घेण्यासाठी जीव धोक्यात घालू नये, ज्या ठिकाणी पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे तेथून जाणे टाळावे. सुरक्षिततेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांनी सावध राहण्याचे आणि धोका टाळण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


