Wednesday, May 13

Tag: will not be implemented

रेतीच्या टिप्परने घेतला आणखी एक बळी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईना NNL

रेतीच्या टिप्परने घेतला आणखी एक बळी; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होईना NNL

नांदेड
नांदेड| जिल्हाधिकारी यांनी शहरातुन अवजड वाहन वाहतुकीला बंदी घातली आहे. मात्र पोलिस प्रशासनाकडून या आदेशाची अमलबजावणी करण्यात चालढकल केली जात आहे. वर्दळीच्या वेळेत शहरातून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव टिप्परने एका दुचाकीस्वाराचा बळी घेतल्याची घटना आनंदनगर रस्त्यावर गुरूवारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. यापूर्वीही शहरात अवजड वाहने आणि गौण खणिज वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अनेक नागरिकांचे बळी गेले. पुन्हा एकाचा जीव गेल्यांने अवजड वाहनावर केलेल्या बंदीच्या आदेशाचा काय..? असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक, दुचाकीस्वारातून विचारला जात आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड शहरातील आनंदनगर भागातून रस्त्याने स्कुटीचालक जातांना रस्त्यावरील एका कारचालकाने अचानक दरवाजा उघडला. त्या दरवाज्याला लागून स्कुटी चालक विजय रामतीर्थकर वय ४५ वर्ष रा.हर्षनगर हे सिमेंट काँक्रेटच्या रस्त्यावर धाडदिशी पडले. याचवे...
error: Content is protected !!