Mla. Srijaya Chavan : ‘पिंपळढव’ जून २०२६ पर्यंत तर ‘रेणापूर सुधा’ दोन महिन्यात पूर्ण करणार
नांदेड| जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील पिंपळढव साठवण तलावाचे काम जून २०२६ पर्यंत तर रेणापूर सुधा प्रकल्पाच्या उंची वाढवण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ. श्रीजया चव्हाण यांना दिले आहे.
बुधवारी सकाळी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना विखे पाटील यांनी ही माहिती दिली. नांदेड जिल्ह्यातील या दोन्ही महत्वपूर्ण प्रकल्पांसंदर्भात भोकर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पिंपळढव साठवण प्रकल्पाचे काम आणि रेणापूर सुधा प्रकल्पाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने भूसंपादन व प्रकल्पांच्या कामासाठी निधी देण्याची तसेच हे प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण करण्याची मागणी त्यांनी आपल्या प्रश्नातून केली होती.
आ. श्रीजया चव्ह...
