Revenue Department : मुरुम उत्खनन करणा-या ठेकेदाराला महसूल विभागाची मूकसमंती
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| तालूक्यातील मौजे रूई येथील शेत सर्वे नंबर ५७ मधून ६ ब्रासच्या सहा वाहानाने आठ दिवसा करीता ५०० ब्रास मूरूम उत्खनन करण्याची परवानगी दिली आहे. परंतु सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत एक वाहन २० ट्रिप मारत आहे १ वाहन १२० ब्रास वाहतूक करत असल्याने सहा वाहने दररोजी ७२० ब्रास मूरूम उत्खनन व वाहतूक करत आहेत.
उत्खनन ठिकाणी महसूल विभागाचा कोणताही कर्मचारी उपस्थित नाही व बारकोड युक्त पावती पुस्तक संबंधिता कडे आहे? आज पर्यंत किती पावत्या देण्यात आल्या? वाहतुक परवान्याची महाखनिज मोबाईल ॲपवर नोदी आहेत ?. ह्याची माहिती तलाठी/ मंडळ अधिकारी यांच्या कडे नसल्याने मुरुम उत्खनन करणा-या ठेकेदाराला महसूल विभागाची मूकसमंती व ऑनलाइन प्रणालीला ठेंगा, त्यामुळे अवैध उत्खनन जोरात होत आहे.
५०० ब्रास करीता सर्व करा सहित 343780.00 एकूण रक्कम भरून अर्जदार शारदा कन्स्ट्रक्शन अँड कॉर्पोरेशन प्...
