Pandit Pradeepji Mishra : ‘जिथे अहंकाराची वृद्धी, तिथे ज्ञानाचा र्हास अटळ’- पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL
नांदेड| जीवनात मान आणि अभिमान या दोघांनाही दूर ठेवले पाहिजे, या दोन्ही गोष्टी जेव्हा वाढायला लागतात, तेव्हा अहंकाराची उत्पत्ती होते आणि अहंकार जेव्हा वाढतो, तेव्हा ज्ञानाचा, बुद्धीचा र्हास अटळ असतो, रावणाच्या जीवनातही तेच घडले,त्यापासून आपण धडा शिकला पाहिजे, शुद्ध पाण्यासारखेच शुद्ध मन आणि शुद्ध वाणी असायला हवी, असे प्रतिपादन पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी शिवमहापुराण कथा वाचनप्रसंगी केले. कथेच्या पाचव्या दिवशीही कथामंडपातील भाविकांची अलोट गर्दी कायमच होती. लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांना पंडितजींनी नमन केले.
पंडितची म्हणाले,शिवमहापुराण कथेत शिवजींना भक्त-वत्सल अशी उपमा दिली आहे, याबाबतची कथा त्यांनी विस्ताराने सांगितली. गोमातेकडे शिवपार्वतीने केलेली पार्थना, दिलेले वचन आणि गोमातेने गिळंकृत केलेल्या शिवजींना आपल्या उदरातून बाहेर काढतानाचा प्रसंग श्रवण करताना भाविक मंत्रमुग्ध झाले होत...
