विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु पट्टाभिषेक रजत सोहळा आता फेब्रुवारी महिन्यात
नांदेड l उत्तराखंडमधील श्री केदारपीठाचे जगद्गुरु यांच्या पट्टाभिषेक सोहळ्यास 25 वर्ष पूर्ण झाले असून यानिमित्त विश्वशांती महायज्ञ व पट्टाभिषेक रजत महोत्सव पुढील वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आला आहे.
केदारपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री 1008 भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांची केदारपीठाचे 324 वे जगद्गुरु म्हणून 3 ऑक्टोबर 2000 मध्ये नेमणून झाली होती. या घटनेस 2025 च्या ऑक्टोबर महिन्यात 25 वर्ष पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्त नांदेड शहरालगत असलेल्या गोपाळचावडी येथील श्री दशमुख आश्रम परिसरात विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु पट्टाभिषेक रजत सोहळा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात आला होता. यासाठी देशविदेशातील विविध धर्मगुरु व राजकारणासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रीत करण्यात आले होते. परंतु महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ...
