Rabindra Singh Modi | अष्टपैलू व्यक्तिमत्व रविन्द्रसिंघ मोदी -NNL
नांदेड शहराच्या विकासात येथील शीख समाजाचा मोठा वाटा आहे. येथील सुप्रसिद्ध धार्मिकस्थल गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेब मुळे नांदेडची कीर्ति समस्त जगतात आहे. नांदेडचा शीख समाज धार्मिक आस्थावान आणि परंपरेला समर्पित असा समाज आहे. येथील शीख समाजात सक्रिय व्यक्तिमत्व असलेले स. रविन्द्रसिंघ मोदी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत. रविंद्रसिंघ मोदी यांचे कार्य समाजान्तर्गतच आहे असे नसून सामान्य माणसासाठी आणि सार्वजनिक हितासाठी झटणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्या व्यतरिक्त रविंद्रसिंघ मोदी यांची एक पत्रकार, कवि, हिन्दी साहित्यिक, वक्ता आणि यूट्यूबर म्हणून एक आगळी - वेगळी ओळख कायम आहे.
मागील तीस वर्षांपासून रविंद्रसिंघ मोदी हे मराठी, हिन्दी आणि पंजाबी वर्तमान पत्रांसाठी पत्रकारिता करीत आहेत. गुरुद्वाराच्या बातम्या असो की स्थानीक शीख समाजाच्या बातम्या असो ते वर्तमान पत्रांच्या मा...
