Vande Bharat train to be extended to Nanded – वंदे भारत ट्रेनचा विस्तार नांदेड पर्यंत होणार – NNL
नांदेड| नांंदेड-हैदराबाद, नांदेड-नागपुर दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु करावी तसेच मुंबई-जालना वंदे भारत रेल्वे नांंदेड पर्यंत विस्तारित व्हावी. शिवाय नांदेड रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छता या साठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी राज्यसभेत अतारांकित प्रश्न मांडले. या अनुषंगाने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत नांदेड पर्यंत विस्तारित करण्याचे अनुषंगाने संबंधित विभागाने तातडीने अहवाल सादर करावा अशी आदेश दिले आहेत त्यामुळे जालना पर्यंत येणारी वंदे भारत नांदेड पर्यंत येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मुंबई - जालना असलेली वंदे भारत रेल्वे नांदेड पर्यंत सोडावी यासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे यापूर्वीच पाठपुरावा केला होता. शिवाय राज्यसभेतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला . खा.डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय र...
