Rahul Kardile ; “नागरिकांनो पाणी जपून वापरा”- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड l नांदेड जिल्ह्याचे तापमान ४३ अंशाच्यावर गेले आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने घट होत आहे. परिणामी मे महिन्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाण्यांची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
शनिवार २६ एप्रिल, २०२५ रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी पाणी टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्येल निवासी उपजिल्हाजधिकारी महेश वडदकर, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, कार्यकारी अभियंता चौगले, जिल्हा प्रशासन अधिकारी गंगाधर इरलोड, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, मनपाचे प्रतिनिधी इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच व्हीसीव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगर परिषदचे मुख्याधिकारी हे सहभागी होते.
सध्या मानार प्रकल्पात ४६ टक्के, विष्णुपूरी प्रकल्...
