Use reflectors for vehicles : वाहनासाठी रिफ्लेक्टर वापरा ;अपघात टाळा जिल्हाधिकाऱ्यांचा चालकांशी संवाद -NNL
नांदेड| रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत आज नांदेडच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत जिल्ह्यातील साखर कारखान्यातील वाहनचालकांसोबत रस्ता सुरक्षा संदर्भातील संवाद साधण्यात आला. स्वतः जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी वाहन चालकांना भेटून त्यांना रस्ता सुरक्षा विषयक सूचना केल्या.
नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर कारखान्यामध्ये सध्या ऊसतोड व ऊस पोहचवण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे हजारो ट्रॅक्टर ट्रॉल्या गावागावातून प्रवास करतात.या ट्रॅक्टर ट्रॉल्यांना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेड यांच्याकडून रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे व त्यांच्या अन्य सहकार्यांनी यासंदर्भात आज सर्व साखर कारखान्याच्या वाहन चालकांची वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूकदारांशी संपर्क साधला.
स्वतः जिल्हाधिकार...
