Wednesday, May 13

Tag: Two lakhs stolen

Bhokar Thift : भोकरमध्ये दुचाकीतील दोन लाख व महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

Bhokar Thift : भोकरमध्ये दुचाकीतील दोन लाख व महिलेच्या गळ्यातील गंठण पळविले

क्राईम, नांदेड
भोकर| बँकेतून उचललेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवून रेनकोट खरेदीसाठी दुकानात गेलेल्या एका कर्मचाऱ्याचे दोन लाख रुपये पळविल्याची घटना ८ जुलै रोजी घडली. तर दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी भरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील गंठण पळविल्याची घटना ५ जुलै रोजी शहरात घडली. आठ दिवसात भरदिवसा चोरीच्या दोन घटना घडल्याने भोकरकर भयभीत झाले आहेत. हिमायतनगर तालुक्यातील पोटा बु. येथील लक्ष्मण दत्तराम सूर्यवंशी यांनी भोकर येथील भारतीय स्टेट बँकेतील स्वतः च्या खात्यातून तीन लाख रुपये काढले व बँकेतून निघाल्यानंतर त्यांनी एक लाख रुपये स्वतः जवळ ठेवले. तर दोन लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून रेनकोट घेण्यासाठी दुकानात गेले. पाळत ठेवलेल्या अज्ञात चोरट्याने या संधीचा फायदा घेऊन डिक्कीतील दोन लाख रुपये घेऊन पोबारा केला. याबाबत लक्ष्मण सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आ...
error: Content is protected !!