Two cases : कंधार व उमरी येथे दाखल असलेले घरफोडीचे दोन गुन्हे उघड
नांदेड| पोलीस स्टेशन कंधार व उमरी येथे दाखल असलेले घरफोडीचे दोन गुन्हे उघड करून आरोपी उमेश सर्जेराव चव्हाण वय 26 वर्षे व्यवसाय बेकार रा. धानोरा ता. कळमनुरी, जि. हिंगोली यांच्याकडून १,३८,५०६/-रुपयाच्या सोन्या चांदीच्या दागिन्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांतील गेलामालासह आरोपी निष्पन्न करण्याचे आदेश अधिनस्त सर्व अधिकारी व अंमलदार यांना दिले होते. त्यावरून दिनांक 23.03.2025 रोजी सहा. पोलीस निरीक्षक रवि वाहुळे व त्यांची टिम नांदेड जिल्ह्यामध्ये पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यातील गेलामालासह आरोपीतांचा शोध घेत असतांना गोपनिय माहिती मिळाली की, आरोपी उमेश चव्हाण हा राष्ट्रीय हि...
