Wednesday, May 13

Tag: Tribute to Loha Ajitdada

Tribute to Ajitdada : लोहयात अजितदादांना श्रध्दांजली ; सर्व प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय बंद

Tribute to Ajitdada : लोहयात अजितदादांना श्रध्दांजली ; सर्व प्रतिष्ठाने शाळा महाविद्यालय बंद

नांदेड, राजकीय
लोहा| राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे अख्खा लोहा शहर व मतदारसंघ शोककळा पसरली असून आमदार प्रतापराव पाटील व कार्यकर्ते डसाडसा रडताहेत.अनाकलनिय वेदनादायी घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. लोहा शहरातील शाळा, महाविद्यालय, सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवून शहरवासियांनी दुखवटा।पाळला. नगर पालिका प्रांगणात बुधवारी सकाळी युवा नेते पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले व श्रद्धांजली वाहण्यात आली. लोहा-कंधार मतदार संघात उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे चाहते प्रचंड होते. निधनाची बातमी कळताच आ, प्रतापरावाना अश्रू अनावर झाले . सगळ्या कार्यकत्यांना घटनेचे प्रचंड दुःख झाले. फारच वाईट झाले असा अंतरकरणातून संवेदना व्यक्त करत कार्यकर्ते अश्रू ढळत होते. शहरात शाळा महाविद्यालय, सर्व दुकाने प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आले व दुखवटा पाळण्यात आला. ...
error: Content is protected !!