Himayatnagar Nagar Panchayat took out cleanliness drive : हिमायतनगर नगरपंचायतीने काढले स्वच्छतेचे धिंडवडे – NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात जिकडे तिकडे घाणीचे साम्राज्य चौका चौकात दुर्गंधीमुळे दिवाळीच्या पर्वामध्ये नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. नगरपंचायतीच्या स्वच्छता विभाग प्रमुखाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळे आजही हिमायतनगर शहरातील नागरिकांना दुर्गंधीयुक्त घाणीचा सामना करावा लागत आहे. सकाळच्या प्रहरी निघणारी काकडा आरती दिंडीतील वारकरी समप्रदायातील महिला पुरुष नागरिकांना या दुर्गंधीने हैराण करून सोडले असल्याने नगरपंचायत पेक्षा जुनी ग्रामपंचायत बरी होती अशी प्रतिक्रिया माजी सरपंच प्रतिनिधी ज्ञेनश्वर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षभरापासून हिमायतनगर शहरात घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी स्वच्छतेचा ठेका देऊन महिन्याला लाखो रुपये खर्च केले जाते आहे. दिवाळीपूर्व शहरातील स्वच्छता ठेवणे नगरपंचाईतीच्या स्वच्छता विभागाचे कर्तव्य असताना मुख्य रस्ते सोडले ...
