Shahaji Umap : कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा वाचावीण्यासाठी व्यसनमुक्त गाव मोहीम – पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप -NNL
नांदेड| व्यसनाधिनतेमुळे ग्रामीण भागात पोहोचलेल्या कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात व्यसनमुक्त गाव मोहीम ही योजना राबविण्यात येत आहे. असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप केले.
ते दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगाव येथून करण्यात आला यावेळी बोलत होते. दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे.
सदर दोन्ही ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर, मौजे खंडाळी येथे झालेल्या कार्यक्रमास लातूरचे अपर पोलीस अधीक्षक ...
