Wednesday, May 13

Tag: to democrat Annabhau Sathe

Annabhau Sathe : तिरंगानगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

Annabhau Sathe : तिरंगानगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांची १०५ वी जयंती शहरातील तरोडा खुर्द क्षेत्रातील तिरंगानगर रघुनाथनगर येथील विठ्ठल निवास येथे मोठ्या उत्साहात भक्तीभावात साजरी करण्यात आली, विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी याच वसाहतीतील फौजी बालाजी देवकांबळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक एन.एम.कांबळे, सेवानिवृत्त बॅंक व्यवस्थापक मधूकर उमरे,हरि फुलवरे,अर्जून पवार प्रा सुरेश गजभारे व अनिल बेंडकेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.मधूकर उमरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतेय काहिली ही लावणी गायली.तर अध्यक्ष बालाजी देवकांबळे, तुकाराम वाठोरे,एन एम कांबळे प्रा सुरेश गजभारे यांनी डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. जयंती सोहळ्याचे...
error: Content is protected !!