Memorendam ; औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन
हिमायतनगर। वाढोणा शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतिने औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवीण्यात आले आहे, यावेळी मोठया प्रमाणावर हिंदू बांधव उपस्थित होते.
ज्या औरंगजेबने धर्मवीर शंभुराजेंची हत्या केली, गुरू तेघबहादर,गुरू गोविंदसिंहांच्या मुलांची हत्या केली, हिंदु मंदिर उद्ध्वस्त केल अशा क्रूरकर्मा राजाची कबर राहने म्हणजे हिंदुस्थानातील हिंदुच्या कपाळी गुलामीचे डाग राहिल. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर औरंगजेबची कबर हटवावी अन्यथा बजरंग दलाच्या वतीने लाखो हिंदुना सोबत घेऊन छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील आणि कारसेवा करून कबर तोडण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे किनवट जिल्हा अध्यक्ष श्याम रायेवार, बजरंग दल वाढोणा तालुका अध्यक्ष सोपान भाऊ कोळगीर, बजर...
