Wednesday, May 13

Tag: to 3 years of rigorous imprisonment

Biloli Court ; अल्पवयीन ग्राहक मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीस ३ वर्ष सश्रम कारावास. बिलोली न्यायालयाचा निकाल -NNL

Biloli Court ; अल्पवयीन ग्राहक मुलीचा विनयभंग करणा-या आरोपीस ३ वर्ष सश्रम कारावास. बिलोली न्यायालयाचा निकाल -NNL

क्राईम, नांदेड
बिलोली। चुलत बहिणी सोबत कानातील पितळेच्या काड्या काढून सोन्याच्या काड्या घालण्यासाठी बिलोली शहरातील सुवर्णकार ज्वेलर्स येथे गेलेल्या एका अल्पवयीन ग्राहक मुलीचा विनयभंग करणा-या गजानन रत्नपारखी यास बिलोली येथील तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ तथा अति. सत्र न्यायाधीश वि. ब बोहरा यांनी दि. २६ नोव्हेंबर रोजी ३ वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दि. २५/०८/२०२२ रोजी सदर घटनेतील पिडीत व तिची चुलत बहीण सायंकाळी ५-३० वाजताच्या सुमारास बिलोली शहरातील गजानन रत्नपारखी यांच्या सुवर्णकार ज्वेलर्स येथे गेले असता दुकानात गर्दी होती. काही वेळाने सर्व ग्राहक निघून गेल्यावर आरोपीने पिडीतेच्या कानातील पितळेच्या काड्या काढल्या. पितळेच्या काड्या काढल्या नंतर पिडीतेच्या कानातून पु येत असल्यामुळे आताच सोन्याचे काड्या घालता येणार नाही काही दिवस लिंबाच्या काड्या घालाव्या लागतील असे सांगितले. त...
error: Content is protected !!