नांदेडकरियर

Assistant Vehicle Inspector : सहाय्यक वाहन निरीक्षकांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद; अचानक दिलेल्या भेटीमुळे सर्वजण चकीत

हिमायतनगर, अनिल मादसवार। नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सायली शंकरवार यांनी तालुक्यातील सरसम बु. येथिल पिएमश्री जिल्हा परीषद प्राथमिक शाळेला कर्तव्यावर असतांना अचानक भेट देवुन विद्यार्थ्यांशी वाहन चालवण्याच्या नियमा पासुन दुचाकी, चारचाकी, अन्य वाहन रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन मुक्त संवाद करत विविध बाबींची महत्त्व पुर्ण माहिती सांगितली.

नित्या प्रमाणे सरसम बु पिएमश्री जिल्हा परीषद शाळा सुरू होती प्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या सहाय्यक परीवहन मोटार वाहन निरीक्षक सायली शंकरवार भोकर हिमायतनगर १६१ ए मार्गावर कर्तव्यावर होत्या त्याच दरम्यान एका खाजगी वाहनाचा पाठलाग करत सरसम बु गावात शिरल्या वाटेत जिल्हा परीषद शाळेचे विद्यार्थ्यी नेमकेच मध्यांतरमुळे शाळे बाहेर पडले होते, लहान विद्यार्थी रस्त्यावर दिसल्याने त्यांनी पाठलाग थांबवण्याचा निर्णय घेतला, मात्र वाहन लहान मुले रस्त्यावर असतांनाही सुसाट पणे पळुन गेले.

याच वेळी आरटीओचे वाहन पलटवतांना त्यांचे लक्ष येथिल जिल्हा परीषद शाळेवर गेले जिल्हा परीषदेची शाळा त्यांना भावली त्यांनी येथिल विद्यार्थ्यांची शाळा भरे पर्यंत शिक्षक वृदांशी संवाद साधला, मध्यांतरा नंतर शाळा भरताच त्यांनी विद्यार्थ्याशी वाहन चालवण्याचे, वाहतुकीचे, रस्ता सरक्षा संदर्भात विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करून माहिती पुस्तीका वाटप केल्या, परिवहन अधिकारी शाळेत अचानक आल्याने सर्वजण अवाक झाल्याच पहायला मिळाल. यावेळी सहशिक्षक राम कोटगीरे, बंडु घाळप्पा, विरांगणा व्यवहारे, संभाजी सुर्यवंशी, रेखाबाई सुर्यवंशी, ग्रंथपाल गोविंद गोडसेलवार, नारायण कदम, विजय वाठोरे, परमेश्वर शिंदे यांची उपस्थिती होती.

मोटार वाहन निरीक्षकाचा असाही संयम
मोटार वाहन निरीक्षक सायली शंकरवार कर्तव्यावर होत्या त्याच वेळी रस्त्यावरील बालकांचा विचार करत स्वत:चे वाहन संयमाने धिमे करून कारवाई पश्चात वाहनाकडे कानाडोळा केला, मात्र त्यांनी केलेल्या कृती बद्दल समाजमाध्यम शिक्षण प्रेमी नागरीकातुन अभिनंदन केले जात आहे, त्यांचा हा संयमी बाणा सर्वांना भावत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button