Tehsildar Vitthal Parlikar : लोहा तालुक्यातील नोंद नसलेल्यांना जन्म मृत्यू दाखला तहसीलदार कार्यालयात मिळणार – तहसीलदार विठ्ठल परळीकर
लोहा| जन्म मृत्यूची वेळेत नोंद नसल्याने ग्रामपंचायत तसेच नगर परिषद कार्यालयाकडून प्रमाण पत्र दिले जात नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागते. राज्य शासनाच्या १२ मार्च २०२५ च्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनीं बीडीओ लोहा तालुक्यातील ग्रामसेवक, नगर परिषद कर्मचारी याची बैठक घेतली व त्यांना नव्या नियमांची माहिती अवगत केली. तहसील कार्यालयात ग्रामीण व शहरी भागात रहिवासी असलेल्याना विलंबाने जन्म मृत्यूचा दाखला कागदपत्रांची पूर्तता केल्या नंतर मिळेल असे तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी सांगितले.
राज्यात जन्म मृत्यू दाखल बाबत तक्रारी आल्या नंतर राज्य शासनाने १२ मार्च २०२५ रोजी नव्याने आदेश निर्गमित केले. त्या आदेशाच्या प्रभावीपणे अंमलबजावणी साठी बुधवार (२५ जून) रोजी तहसीलदार विठ्ठल परळीकर याच्या उपस्थितीत तहसील सभागृहात बीडीओ ,नगर परिषद मुख्याधिकारी ग्र...
