Volleyball Sports Tournament : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेला होणार शनिवारपासून सुरुवात -NNL
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाद्वारे पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ व्हॉलीबॉल (पुरुष) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आज दि. १४ डिसेंबर रोजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड गुरुद्वारा लंगरचे बाबा बलविंदरसिंघजी, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील, पॅरा ऑलिंम्पिक अॅथेलेटिक्स खेळाडू भाग्यश्री जाधव, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू व आंतरराष्ट्रीय पंच अंजली पाटील, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व स्पर्धा समन्वयक अंकुश पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
चार दिव...
