on the way to leave the support of Congress leaders : हिमायतनगरातील काँग्रेसचे निष्ठवंत युवा कार्यकर्ते काँग्रेसच्या साहेबांची साथ सोडण्याच्या मार्गावर -NNL
हिमायतनगर,अनिल मादसवार| मागील पंचवार्षिक निवडणुकीत जीवाचे रान करून साहेबांचे काम करणाऱ्या काँग्रेसच्या निष्ठावंत युवा कार्यकर्ते पक्षात न्याय देण्यात दुजाभाव केला जातो. अशी नाराजी व्यक्त करत साहेबांची साथ सोडण्याचा तयारीत असल्याचा संदेश फेसुबक या सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची चापलुसी करणाऱ्यां काही पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वागण्याचामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुरावले जाऊ लागले असून, याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत आहे.
काँग्रेस पक्षाचे इमाने इतबारे काम करणारे अनेक युवा कार्यकर्ते सत्ताधारी काँग्रेस नेर्त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज झाले असल्याचे चित्र सध्या शहर व तालुका परिसरात सुरु असलेल्या विकास कामाच्या देवाण घेवाणीवरून दिसून येऊ लागले आहे. मागील विधानसभा निवडणूक पूर्व काळात हिमायतनगर येथील स्व. परमेश्वर भो...
