आगामी विधानसभेची लगीन घाई माजी आ. प्रदीप नाईक यांनी तालुक्यात दिला भेटीगाठीवर जोर -NNL
किनवट,परमेश्वर पेशवे| आगामी काळात विधानसभेची लगीनघाई लक्षात घेऊन निवडणूक कधी लागेल याचा नेम नसल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांनी किनवट तालुक्यात भेटीगाठीवर जोर दिला. व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यास सुरुवात केली.
महाविकास आघाडीच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करत लोकसभा निवडणुकी दरम्यान रात्रंदिवस एक करत महाविकास आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांना किनवट माहूर मतदार संघातून अधिक मताची बेरीज जुळवत अधिक मताने लीड देऊन निवडून आणले,अशा या किनवट माहूर मतदार संघात मतदारांशी संवाद साधण्यासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापूर शिवनी, कुपटी कोसमेट, कोल्हारी भिसी, पांगरी या गावांना भेटी देऊन मतदारांची संवाद साधत असता मोठ्या प्रमाणात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
माजी आमदार प्रदीप नाईक हे शिवणी येथे आले असता एक संयमी आणि विकासभिमुख नेता म्हणून त्यांच्याकडे ...
