dlip thakur : सोमवारी सकाळी मुसळधार पाऊस पडत असताना देखील नियोजित ६४ व्या महिन्याच्या कायापालट
नांदेड l या उपक्रमाला खंड पडू नये म्हणून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या पुढाकारातून डोक्यावर छत्री धरून ४३ भ्रमिष्ठांची मोफत दाढी कटिंग करून नवीन कपडे,चहा फराळ व शंभर रुपयाची बक्षिसी देण्यात आली.
आर्थिक अडचणीमुळे किंवा वेडसरपणामुळे डोक्याचे जंगल बनलेल्या रस्त्यावरील निराधारांना विश्वासात घेऊन त्यांची कटिंग दाढी करण्याचा " कायापालट " हा उपक्रम सहा वर्षांपूर्वी दिलीप ठाकूर यांनी सुरू केला होता. सोमवारी सकाळी सहा वाजता सर्वांची दाढी कटिंग करण्याचा निरोप सर्व बेघरांना आदल्या दिवशीच देण्यात आला होता. पहाटेपासून तुफान पाऊस पडत असल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.
पण संयोजक दिलीप ठाकूर यांनी कार्यक्रम घ्यायचा असा निर्धार केला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, भाजपा प्रदेश संघटन मंत्री संजय कोडगे भाजपा अध्यक्ष अमरनाथ राजुरकर, डॉ. संतुकराव...
