Buddha Pahat ; संगीतमय ‘ बुद्ध पहाट ‘ ने वातावरण धम्ममय
नांदेड l तथागत भगवान बुध्द यांच्या २५८८ व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघा च्यावतीने दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी कुसुम सभागृह येथे सोमवारी ( दि.१२) पहाटे पाच वाजता आयोजित बुध्द पहाट या बहारदार कार्यक्रमाला नांदेडकर रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध गायक चेतनकुमार चोपडे प्रस्तुत् तुझ्या पाऊल खुणा भीमराया या बुध्द भिम गीत गायनाच्या सुमधुर संगीतमय सादरीकरणाने वातावरण धम्ममय झाले. नांदेडकरांच्या प्रचंड प्रतिसाद पार पडलेल्या बुद्ध पहाट कार्यक्रमांनी उपस्थित मंत्रमुग्ध झाले.
आज बुध्द पौर्णिमेच्या दिवशी भल्या पहाटे हजारो बौद्ध उपासक आणि उपासिका पांढरा शुभ्र पोशाख परिधान करून अतिशय श्रद्धायुक्त भावनेने या बुध्द पाहत या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या प्रसन्न आणि सांगीतिक कार्यक्रमाने कुसुम सभागृह अगदी भारावून गेले असल्याचे चित्र दिसून ...
