flood victims ; पूरग्रस्तांच्या यादीवर आक्षेप व मागणी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १५ मार्च पर्यंत वाढवावी – माकप
नांदेड l मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने सहा महिन्यापासून विविध आंदोलने करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना १८ करोड रुपये अनुदान पोटी मंजूर करून घेतले आहेत.
६ सप्टेंबर रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आदेश काढून मनपा आणि तहसील कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण करून पंचनामे करण्याची जबाबदारी निश्चित केली होती. अत्यंत छुप्या पद्धतीने सर्वेक्षण करून पंचनामे तहसीलदार यांना सादर करण्यात आले आहेत. त्या पंचनामे व यादी मध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे.
अनेक नावे पुन्हा पुन्हा तसेच एकाच नावाने वेगवेगळे बँक खाते क्रमांक, जीपीएस द्वारे फोटो काढण्याचा अभाव, प्रत्यक्षात जायमोक्यावर भेट न देता पात्र यादीत नाव टाकणे अशा शकडो त्रुट्या दोन टप्यात प्रसिद्ध केलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत आहेत. ही यादी प्रसिद्ध करू नये व बोगस लाभ...
