The door that awaits… वाट बघणारं दार….
आपल्या देशात गतीमान पध्दतीने रस्तेविकास सुरू आहे सोबतच याचा हातभार देशाच्या विकास गतीला उभारी देण्यात होत आहे. ही नाण्याची एक बाजू असली तरी या गतिमानतेसोबतच देशात अपघात आणि त्यात होणारे मृत्यू आणि आर्थिक नुकसान ही एक चिंतेची बाब आहे.
आपण नुकतेच नव्या वर्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर सन 2025 ची आकडेवारी समोर आली आहे या नुसार देशात वर्षभरात 9 लाख 72 हजार जणांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झाला आहे. सरासरीचा विचार करता दिवसाला साधारण 471 जण या अपघातात प्राणास मुकले आहेत. महिन्याला 14 हजारांहून अधिक (14130) अपघातात मरण पावले आहेत.
अपघात वाढले याचे मुख्य कारण अर्थात गतीचे वेड असणारी नवी पिढी होय. होणाऱ्या अपघातांमध्ये दुचाकी वाहनचालकांचे प्रमाण जास्त आहे. शासन विविध स्तरावर जनजागृती आणि सुरक्षा उपाय करीत आहे. त्यानंतरही हे अपघात होत आहेत.
अपघातात प्राण गमावणाऱ्यांची सर्वाधिक संख्या उत्...
