Fed up with the partial pipeline project of Himayatnagar : हिमायतनगरच्या अर्धवट नळयोजनाला कंटाळून नागरिकांनी सुरु केले बेमुदत आमरण उपोषण
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहराची कायमस्वरूपी तहान भागविण्यासाठी १९ कोटी १९ लक्ष रुपयाच्या मंजूर झालेल्या नळयोजनेचे काम गेल्या सहा वर्षांपासून अपूर्ण (Fed up with the partial pipeline project of Himayatnagar) आहे. त्यामुळे शहरातील ३० हजार लोकसंख्येला दिवाळीपासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबाबत अनेकदा निवेदन देऊनही ठेकेदार काम पूर्ण करण्यास टाळाटाळ करत असून, आता भीषण पाणी टंचाईचा सामना शहरावासीयांना करावा लागत आहे. तात्काळ हि योजना सुरु करून नागरिकांची तहान भागवावी या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत घरातील नळाला पाणी येणार नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यानी घेतला आहे.
हिमायतनगर नगरपंचायत कार्यालय अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजनेचे काम दिनांक ०२/०७/२०१९ पासून सुरु झाले. शहर...
