Disabled couple set up self-employment : महापालिकेच्या सौजन्याने 5 टक्के राखीव निधीतून दिव्यांग दांपत्याने उभारला स्वयंरोजगार; मनपा प्रशासनाचे मानले आभार -NNL
नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सौजन्याने नांदेड शहरातील सोमेश काॅलणी परीसरातील दिव्यांग दांपत्य श्री व सौ विद्या शिवाजी सुर्यवंशी या दिव्यांग दांपत्याला दोन अपत्य असुन गत अनेक वर्षांपासून सोमेश काॅलणी परीसरात किरायाच्या घरात ते आपला व आपल्या परीवाराचा उदरनिर्वाह भागवत आपल्या दोन्ही मुलांच्या संगोपन करतात. बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड या संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शिवाजी सुर्यवंशी यांनी दिव्यांग नेते राहुल साळवे यांच्यासोबत गत 2010 पासुन काम सुरू केले. महापालिकेकडील दिव्यांगांचा राखिव निधी खर्च व्हावा यासाठी गत 2015 पासुन विविध आक्रमक आंदोलने उपोषणे आणि मोर्चे काढले आणि शासन निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली.
दिव्यांगांच्या या आंदोलन व मोर्चाची दखल घेऊन 2016-2017 मध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महापालिका महापौर उपमहापौर निवडी दरम्यान एक महत्वपु...
