Jigyasa Abhyasika ; डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिज्ञासा अभ्यासिकेत तहसीलदार परळीकर याचा हस्ते भूमीपुत्रांचा गौरव
लोहा l शिक्षण हे जीवन परिवर्तनाचे मध्यम आहे .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आयुष्यभर जर तुम्ही शिकलात तर अथांग ज्ञानाच्या सागरात आपण गुडघाभर सुद्धा जाणार नाही .त्याची शिकवण अंगीकार करणे गरजेचे आहे.जिज्ञासा अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते अभ्यासाची सोय केलीं जाते ही कौतुकास्पद बाब होय असे मार्गदर्शन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने लोह्यातील जिज्ञासा अभ्यासिका येथे तहसीलदार परळीकर याच्या हस्ते गुणवंताचा व सामाजिक समता निर्माण करणाऱ्या मान्यवरांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम , रामराव सूर्यवंशी , दता वाले, सोनू संगेवार छत्रपती धुतमल, प्रा डी एम पवार, प्रा संजय बालाघाटे, हरिभाऊ चव्हाण हरिभाऊ चव्हाण, मुख्याध्यापक डी ई वडजे, मुख्याध्यापक एच ...
