Wednesday, May 13

Tag: teacher-parent dialogue should be created

Deputy Director of Education Dr. Ganpat More | शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षक-पालक संवाद घडवावा-शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे – NNL

नांदेड
नांदेड| जिल्ह्यातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन शिक्षक पालक संवाद घडवावा, असे मत लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्हयातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. विष्णूपूरी येथील ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस येथे नुकतेच शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड व ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस विष्णूपूरी नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सहविचार सभेतून नांदेड जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना ते मार्गदर्शन करत होते. शाळेतून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी व क्लासेसकडे वळलेला विद्यार्थ्यांचा ओढा शाळांकडे पुन्हा वळविण्यासाठी शिक्षकांनी शाळातून प्रात्यक्षिक करवून घेत शिक्षणात रस निर्माण करावा ...
error: Content is protected !!