Thursday, May 14

Tag: Taluka-level launch of ‘Sampornata Abhiyan 2.0’ at Kinwat by MLA Bhimraoji Keram

Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Mla Bhimrao Keram : आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

नांदेड, राजकीय
नांदेड l केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियान २.०चा तालुकास्तरीय शुभारंभ आज आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते पंचायत समिती, किनवट येथे उत्साहात पार पडला. किनवट तालुका हा आकांक्षित तालुका कार्यक्रमात समाविष्ट असून, मागील वर्षी यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या संपूर्णता अभियानाच्या पुढील टप्प्याच्या रूपाने हे अभियान राबविले जात आहे. २८ जानेवारी ते १४ एप्रिल २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानात आरोग्य-पोषण, शिक्षण तसेच कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रांतील एकूण ६ महत्त्वाचे निर्देशक १०० टक्के पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावेळी आमदार भिमरावजी केराम यांनी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करावीत, असे आवाहन केले. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभाग व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा...
error: Content is protected !!