Sand thift action ; माहूर महसूल पथकाची अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टरवर कारवाई -NNL
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। तालुक्यातील सायफळ वाळु घाटातून अवैध रित्या वाळु वाहतुक करणार्या ट्रॅक्टरवर माहूर महसूल विभागाने धडाकेबाज कारवाई केली असून तालुक्यातील वाई बाजार येथे दि.२० डिसें.रोजी भल्या पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.सदरील कारवाईतील ट्रॅक्टर माहूर तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केल्याची माहिती महसूल कर्मचार्यांनी दिली आहे.
माहूर तालुक्यातील अनेक गावाला पैनगंगा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या पैनगंगा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर वाळूची तस्करी होत असते.आजपर्यत अनेक वाळू तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु वाळूची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.अशातच दि.२० डिसें रोजी वाई बाजार येथे सकाळी ५:३० ते ६ वाजताच्या सुमारास सायफळ येथून वाळूची अवैध वाहतूक करणारा विना नंबर असलेला स्वराज कंपणीचा लाल पांढरा ट्रॅक्टर नायब तह...
