Suggestively : “सहज सुचलं म्हणून” नाटकाने रसिकांना अंतर्मुख केले -NNL
नांदेड| जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे “सहज सुचलं म्हणून” या नाटकाने, ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. परभणीच्या क्रांती हुतात्मा चारिटेबल ट्रस्टने सादर केलेल्या या नाटकात, आस्तिक-नास्तिक विचारसरणींच्या वादातून उलगडणाऱ्या जीवनाच्या गूढ शक्तीवर भाष्य करण्यात आले आहे. रविवारी (ता.१) हे नाटक कुसुम सभागृह नांदेड येथे पार पडले.
रविशंकर झिंगरे लिखित आणि मनीषा मधुकर उमरीकर दिग्दर्शित या नाटकाची विशेषता म्हणजे दोन मित्रांच्या संवादातून उभा राहणारा तात्त्विक प्रवास. जीवनातील देवाच्या अस्तित्वाबाबतची चर्चा आणि या संकल्पनेला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना अंतर्मुख करतो.
सुनिलची भूमिका अनिकेत शेंडे यांनी साकारली असून, आकाश जव्हार यांनी अनिलची भूमिका निभावली आहे. श्रीपाद राजूरकर (चहावाला) आणि अमोल गोरकट्टे (देव) यांनीही आपापल्या...
