नांदेडमुंबईराजकीय

नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 1 डिसेंबरला रात्री 10 पर्यंत प्रचाराची मुदत

मुंबई l नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होत असून, त्यासाठीच्या जाहीर प्रचाराची मुदत ‘महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965’ मधील तरतुदीनुसार 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 पर्यंत असेल.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांस संबंधित कायद्यांमधील तरतुदींनुसार घेतल्या जातात. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसंदर्भातील कायद्यात जाहीर प्रचाराचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार मतदान सुरू होण्याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजे 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजल्यापासून प्रचार पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर प्रचारसभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. त्याचबरोबर निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरातींची प्रसिद्धी किंवा प्रसारण करता येणार नाही.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button