Parbhani ; परभणी मधील नंगानाच थांबवून,सामाजिक सलोखा प्रस्थापित करा – माकपचे पोलिसांना आवाहन – NNL
नांदेड l नुकत्याच सार्वत्रिक विधानसभा निवडणुका होऊन राज्यात भाजपचे सरकार आरुढ होते न होते की लगेच परभणी शहरात भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होऊन दंगल होणे हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी खेदजनक बाब आहे.
ज्यांनी हे कृत्य केले त्या आरोपी विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात यावी.हे प्रकरण अतिशय संवेदनशील असून पोलिसांनी सूडाच्या भावनेने न वागता शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे.
परंतु उलट श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी येथे कायद्याचे तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सुर्यवंशी यास जमानत झालेली असतांनाही त्याचा पोलिसांच्या कोठडीत मृत्यू होणे ही अतिशय संतापजनक घटना असून अत्यंत वेदनादायी आहे.
या मृत्यू प्रकरणी तातडीने संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, सोमनाथ सूर्यवंशी च्या पालकांना रुपये ५० लाखांची मदत करावी व त्याच्या घरातील...
