valid certificates : विद्यार्थ्यांना जाता वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर
नांदेड| राजर्षी शाहू महाराज जयंती पर्वच्या अनुषंगाने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यासाठी 26 जून ते 4 जुलै 2025 दरम्यान सन 2025-26 मध्ये प्रवेशीत इ. 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिम शिबीर राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज भरुन त्याची प्रिंट काढून शिबिराच्या कालावधीत समिती कार्यालयात उपस्थित राहून त्वरीत जमा करावेत, असे आवाहन समितीचे अध्यक्ष व उपायुक्त तथा सदस्य व संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्यावतीने करण्यात आले आहे.
"राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व" च्या अनुषंगाने 26 जुन ते 4 जुलै 2025 या कालावधीत सन 2025-26 या वर्षातील प्रवेशित इ. 11 व 12 वी विज्ञान शाखेतील ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आजपर्यंत ऑनलाईन अर्ज भरले नाहीत अशा सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यां...
