Social Content in Savitribai Phule’s Poetry : सावित्रीबाई फुले यांच्या कवितेतील सामाजिक आशय – NNL
सावित्रीबाई फुले म्हणजे आमच्या सांस्कृतिक महामाता. या देशातील तमाम दीन दलित अस्पृश्य शुद्रातिशुद्रांना माणूस म्हणून जगण्याचा अर्थ शिकविणारी विश्वशिक्षिका. मेलेल्या कोट्यावधी देहांमध्ये प्राण फुंकणारी ही सावित्री म्हणजे सावित्रीमाई. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले. ज्या महामातेला ज्या ज्योतिबांनं शिकवलं. धर्म नावाच्या क्रुर व्यवस्थेच्या विरोधात शिक्षणाचं शस्र करुन उभं केलं.
अज्ञान अंधश्रद्धेच्या काळ्याकुट्ट दलदलीत पिढ्यानपिढ्या खितपत पडलेल्या ज्यांचं जगणं जनावरांपेक्षाही हीनदीन होतं, अशांना उजेडाची वाट दाखवणारा महात्मा फुले. ते महात्मा नव्हेत तर शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्मावा अशी अपेक्षा न ठेवता आधी स्वतःच्या घरात क्रांतीची सावित्रीज्योत पेटवणारे ते क्रांतिबा. निव्वळ बोलके नव्हे तर कर्ते सुधारक क्रांतिबा ज्योतिबा फुले. या दांपत्याने मानवी जीवनाच्या प्रगतीचे महाद्वार ज्याने कायमस्वरूपी उघ...
