Smt. Savita Birge Madam : एक प्रेरणादायी शिक्षण अधिकारी: श्रीमती सविता बिरगे मॅडम -NNL
श्रीमती सविता सिदगोंडा बिरगे मॅडम यांचा जीवनप्रवास जिद्द, संघर्ष आणि यशाची एक अद्वितीय कहाणी सांगणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहून त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. शिक्षिकेच्या भूमिकेतून शिक्षणाधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा समाजासाठी दीपस्तंभाचा आदर्श ठरतो.
1987 साली दहावी आणि 1989 साली D.Ed. पूर्ण करून त्यांनी खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1992 मध्ये जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. खाजगी शाळेत उत्कृष्ट कामगिरीनंतर जिल्हा परिषदेत नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्यातील विद्यार्थी जिवंत ठेवत शिक्षण सुरूच ठेवले. 1998 साली बी.एड., 2005 साली एम.ए. (मराठी), 2006 साली एम.एड., 2013 साली सेट परीक्षा आणि 2022 साली पीएच.डी. हे उच्च शिक्षण पूर्...
